🕒 1 min read
मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अजून एक मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेऊन गटनेता बदलण्याची मागणी केली. १८ खासदारांपैकी १२ जणांचा गटनेता म्हणून खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांना पाठिंबा असल्याने गटनेतेपदी शेवाळे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. लोकसभाध्यक्ष ओम बिरला यांनी ही मागणी मान्य केल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी काल (१९ जुलै) शिवसेना भवनमध्ये उत्तर भारतीय महासंघाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. तसेच सायंकाळी पदाधिकाऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी “तुम्ही आमच्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, पण ते बाण चालविण्यासाठी धनुष्य तर लागेल ना? ते धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा.”, असा इशारा शिंदे गटाला दिला. तसेच कितीही संकटे आली तरी संघर्ष करू, पुन्हा पक्ष नव्याने उभा करू, असा निर्धारही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
शिंदे-ठाकरे संघर्षावर आज सुनावणी-
शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्ता संघर्षाचा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. शिवसेनेशी बंड करत सत्तास्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटावर शिवसेनेने अपात्रतेची कारवाई केली होती, याला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केल्या आहेत. यावर ११ जुलैच्या सुनावणीत पुढील सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कोणतीही कारवाई होऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच सदरील प्रकरण सरन्यायाधीश रमण यांनी खंडपीठ स्थापन करून सुनावणी केली जाईल, असे स्पष्ट केले होते.
दरम्यान आज बुधवारी (२० जुलै) सरन्यायाधीश रमण, न्या. कृष्णा मुरारी आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय शिवसेनेतील बंडखोरी ते राज्यातील सत्तांतर आणि विधानसभेतील बदलांची कायदेशीर वैधता यावर सुनावणी देईल.
महत्वाच्या बातम्या:
- Rahul Shewale : उद्धव ठाकरेंना धक्का! खासदार राहुल शेवाळे यांची शिवसेनेच्या लोकसभा गटनेतेपदी निवड
- Breaking news : मोठी बातमी : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक
- Rajendra Janjala : “कुस्तीच्या आखाड्यात समोरच्या पहिलवानाने लंगोटच काढून घेतल्यानंतर…”; राजेंद्र जंजाळांची खैरेंवर सडकून टीका
- Raosaheb Danve: उद्धव ठाकरेंना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून… – रावसाहेब दानवेंची टीका
- Kishori Pednekar | “जायचं असेल तर सरळ जा परंतु…” ; रामदास कदमांच्या आरोपानंतर किशोरी पेडणेकर आक्रमक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
