Share

भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर संजय राऊत म्हणाले…

Published On: 

मुंबई: पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. मात्र आता या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) घेतलेल्या या निर्णयानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. विरोधकांकडून होणाऱ्या या टिकेनंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या बारा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातला, विधानसभेत गोंधळ घातला, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली, अशा लोकांवर जी सर्वोच्च न्यायालयानं सहानुभूती दाखवली आहे, मग ती सहानभूती अधिकार आमच्या बारा आमदारांना का नाही, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, १२ आमदारांचे निलंबनाबाबत न्यायालयानं विधानसभेच्या अधिकारावर अतिक्रमण केलं आहे. आमची बारा आमदारांची फाईल दाबून ठेवली ते सुद्धा राजकीय सुडापोटी दाबून ठेवली आहे. ज्या प्रकारे न्यायालयाचा हस्तक्षेप गृहमंत्रालयाचा हस्तक्षेप, सत्ताधारी पक्षांचा हस्तक्षेप हे लोकशाही मृत्यू पंथाला लागल्याचं चित्र आहे, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!