🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले आहे. मात्र ऑक्शनच्या काही आठवड्या आधीच चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी चेन्नईमध्ये पोहचला आहे. धोनीसाठी यावर्षीचे मेगा ऑक्शन शेवटचे ठरू शकते. त्यामुळे तो सगळ्या गोष्टींकडे गंभीरतेने लक्ष देत आहे. मात्र धोनी असे चेन्नईला अचानक पोहचल्याने अनेक चर्चांनी जोर धरले आहे.
गुरुवारी संध्याकाळी सोशल मीडियावर धोनीचे चेन्नईच्या हॉटेल मध्ये स्वागत होतानाचे फोटो व्हायरल व्हायला सुरुवात झाली. मेगा ऑक्शन बँगलोरमध्ये होणार आहे, मात्र त्याआधी धोनी तयारीसाठी चेन्नईमध्ये पोहचला आहे. ऑक्शनमध्ये टीम सिलेक्शन , स्पर्धेसाठी रणनिती या गोष्टींवर तो चर्चा करणार आहे. ऑक्शनवेळी धोनी तिथे उपस्थिती लावणार का हे मात्र सध्या नक्की झालेले नाही.
The ???? goes ????, every single time! #ThalaDharisanam #WhistlePodu ???? pic.twitter.com/IihZJsuDVQ
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) January 27, 2022
महेंद्रसिंह धोनीसाठी आयपीएल २०२२ हे हंगाम शेवटचे असल्याचे बोलले जात आहे. मेगा ऑक्शन आधीच चेन्नई सुपर किंग्जने ४ खेळाडूंना रिटेन केले होते. ज्यात धोनी , रवींद्र जडेजा , ऋतुराज गायकवाड आणि मोईन अलीचा समावेश आहे. चेन्नईने त्यांच्या अनेक जुन्या खेळाडूंना मेगा ऑक्शनमध्ये पाठवले आहे. ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आता नवीन संघ स्थापन करत आहे असे सांगितले जात आहे. ज्यात धोनीच्या जागी जडेजा कर्णधार असेल अशी ही चर्चा सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सगळ्यांनी अधिकाधिक दारू ढोसावी, असं बहुधा या सरकारचं मत आहे- चंद्रकांत पाटील
- हायकोर्टाचा मोठा निर्णय! ‘त्या’ १२ भाजप आमदारांचे निलंबन रद्द
- “‘त्या’ क्रीडांगणासाठी जनतेच्या पैशांचा चुराडा होत आहे”, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- “…हा हिंदुद्वेष्टाच होता पद गेल्यानंतर पिसाळलाय”, अन्सारींच्या वक्तव्यावर भातखळकरांचे टीकास्त्र
- भाजप आ. अमित साटम यांची महापौर पेडणेकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
