मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांबाबत यापुढे कोणतेही वक्तव्य करणार नाही अशी हमी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मुंबई उच्य न्यायालयात दिली आहे. नवाब मलिकांना न्यायालयाने लेखी हमी देऊनही मलिकांकडून त्याचे उल्लंघन झाले. त्यामुळे आज मलिकांना माफी मागावी लागली आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये वापरलेल्या चु** या शब्दावरुन भाजपच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर याचे स्पष्टीकरण देताना संजय राऊतांनी त्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगितला आहे. या सर्व प्रकारावरुन भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘बिनशर्त माफी’ ला समानार्थी शब्द काय असेल? नवाब मलिकजी हे तुम्ही संजय राऊत यांना विचारायला पाहिजे होते. ते आजकाल फार समानार्थी शब्द शोधत असतात. माणसाने आधी असे कृत्य करूच नये, की ज्यामुळे बिनशर्त माफी मागावी लागेल, असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आहे.
'बिनशर्त माफी' ला समानार्थी शब्द काय असेल? @nawabmalikncp जी
हे तुम्ही @rautsanjay61 यांना विचारायला पाहिजे होते! ते आजकाल फार समानार्थी शब्द शोधतायत!
माणसाने आधी असे कृत्य करूच नये, की ज्यामुळे बिनशर्त माफी मागावी लागेल! pic.twitter.com/xIw8u8Fexh— Prasad Lad (@PrasadLadInd) December 10, 2021
महत्वाच्या बातम्या
- आपण काय बोलतो याचं जरा भान ठेवलं पाहिजे; अजित पवारांचा आशिष शेलारांना टोला
- आरोग्य विभागाच्या पेपरफूटीवर अजित पवार म्हणतात, त्याच्यावर…
- चक्क सलमान खानच्या बहिणीने केले कतरिनाच्या लग्नाचे फोटो शेअर
- भाजपने ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याच्या राजीनाम्याची केली मागणी
- अजित पवारांचे मोठे वक्तव्य; बूस्टर डोस उपलब्ध आहेत, पण…


