🕒 1 min read
मुंबई : पंतप्रधान मोदींनी पेट्रोल डिझेलच्या दरावरुन कोव्हिडविषयक बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांनीही नरेंद्र मोदींना जीएसटीच्या थकबाकीची रक्कम सांगत मोदींना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. तसेच महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत दुय्यम वागणूक दिली जात आहे, असा तीव्र आक्षेपही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लागोपाठ ३ ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. म्हणाले, “दोषारोप आणि जबाबदारी झटकणे, यापेक्षा दुसरे काही करणार तरी आहात का? सवाल आहे. जीएसटीचा निधी राज्याला नियमित मिळतच असतो, जुनीही थकबाकी मिळाली आणि उरलेली देण्याची मुदत जुलै 2022 आहे. मग जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलवर आकारलेला अतिरिक्त कर ग्राहकांना परत करणार का? असा सवालही फडणवीसांनी विचारला आहे”.
दोषारोप आणि जबाबदारी झटकणे!
यापेक्षा दुसरे काही करणार तरी आहात का❓
मुद्दा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा आणि तुम्ही जीएसटीचा विषय घेऊन बसलात.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरू ❗️ https://t.co/vrgDYGXAq6— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 27, 2022
“शेजारच्या दीव-दमणमध्ये 103 रुपयांत पेट्रोल मिळते, तर महाराष्ट्रात 120 रुपयांना का? याचं उत्तर मिळालंच पाहिजे, असंही फडणवीसांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाचा आदर करीत महाराष्ट्रातील जनतेला, मराठी माणसाला तत्काळ दिलासा द्या, अशी आग्रही मागणी फडणवीसांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरु”, असा टोलाही ट्विटचा शेवट करताना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
