Share

संभाजी भिडे सायकलवरून चक्कर येऊन पडले, गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल

Published On: 

🕒 1 min read

सांगली : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असणारे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे उर्फ मनोहर भिडे चक्कर आल्यामुळे सायकलवरून पडले असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत संभाजी भिडे गंभीर जखमी झाले असल्याची बाब समोर येत आहे. त्यांना कमरेखाली कुब्याला जबर मार लागला असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. भारती रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

संभाजी भिडे हे नित्यनेमाने सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असतात. आजही ते गणपती मंदिराकडे दर्शनासाठी सायकलवरून निघाले होते. भिडे हे सायकलीवर असताना गणपती पेठ परिसरात त्यांना चक्कर आली. यामुळे ते जमिनीवर कोसळले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे

भिडे यांना कमरेखाली कुब्याला जबर मार लागला आहे. यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्वरित त्यांना भारती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!