नवी दिल्ली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) काल सातारा जिल्ह्यातील फलटणच्या दौऱ्यावर होते. फलटणमधील भाजपच्या (BJP) कार्यक्रमात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांच्या या टीकेला संजय राऊतांनी आज दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे.
संजय राऊत हे डबल ढोलकी व्यक्तिमत्त्व आहे. खुर्ची टीकवण्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत. ममता बॅनर्जी आल्या की त्यांच्या सुरात सूर मिसळायचे आणि राहुल गांधी आले की त्यांच्या सुरात सूर मिसळायचे हे एवढेच राऊतांचे काम आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
चंद्रकांत पाटलांना तुम्ही इतके गांभीर्याने का घेता? त्यांची वक्तव्य नैराश्यातून, वैफल्यग्रस्तातून येत असतात. तुम्ही देखील त्यांना गांभीर्याने घेत जाऊ नका अन्यथा तुम्हाला त्रास होईल, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
माझं उत्तर ऐकून त्यांना त्रास होईल, चंद्रकांत पाटलांची प्रकृती नीट रहावी म्हणून मी उत्तर देत नाही. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. विरोधी पक्षाच्या काळजीपोटी मी उत्तर देत नाही, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर जया बच्चन यांचे ‘लाल टोपी’ घालून प्रत्युत्तर
- तरुण खेळाडूंना करावी लागणार प्रतीक्षा; दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दिग्गजच
- शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात; चंद्रकांत पाटलांचा टोला
- जॅकलीनच्या अडचणीत वाढ; ईडीने समन्स बजावल्यानंतर दिल्ली कार्यालयात हजर
- महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप एकत्र?, प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट


