🕒 1 min read
नवी दिल्ली: गोरखपूर येथे विविध विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी बोलताना मोदी यांनी समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला होता. समाजवादी पक्षाच्या लाल टोपीचा उल्लेख धोकायदाक असा केला. या लाल टोपीचा संबंध लाल दिव्याच्या वाहनाशी जोडत या पक्षाचे नेते सत्तेसाठी हपापलेले आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षावर केला. त्यावर आता समाजवादी पार्टीच्या नेत्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी कडाडून टीका केली आहे.
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि जया बच्चन यांच्यासहित १२ खासदारांनी सभागृहाबाहेर आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी जया बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. जया बच्चन म्हणाल्या, सध्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या रॅली होत आहेत त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यावरुन जनमत आम्हाला आहे असे म्हणता येईल. विरोधक ज्या प्रकारे बोलत आहेत त्यांच्याप्रती नागरिकांमध्ये राग आहे याचा त्यांनी विचार करावा, असा खोचल सल्ला त्यांनी यावेळी दिला.
युपीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नुकतचं शिलान्यासाचं उद्धघाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी डोक्यावर लाल टोपी परिधान केली होती. यावरुन जया बच्चन यांनी मोदींवर टीका केला आहे. तुम्ही आम्हाला लाल टोपी म्हणजे रेड अलर्ट आहे असे म्हटला होतात. मी मात्र मोठ्या दिमाखात लाल टोपी घालणार आहे. मी पण पाहते आम्हाला लाल टोपी घालण्यावाचून कोणं कसं थांबवतं ते, अशी संतप्त प्रतिक्रिया जया बच्चन यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- तरुण खेळाडूंना करावी लागणार प्रतीक्षा; दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दिग्गजच
- शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात; चंद्रकांत पाटलांचा टोला
- जॅकलीनच्या अडचणीत वाढ; ईडीने समन्स बजावल्यानंतर दिल्ली कार्यालयात हजर
- महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप एकत्र?, प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
- नागालँड घटनेतील जखमी व्यक्तीने अमित शहांचा दावा फेटाळला, म्हणाला, ‘इशारा न देताच…’

