Share

महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप एकत्र?, प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Published On: 

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे एकत्र लढणार का यावर राजकारणात चर्चा रंगत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपचे अनेक नेते भेटले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता भाजपचे नेते प्रसाद लाड यांनीही आज राज ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीवरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

आज मी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. त्यांच्याशी मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. जेव्हा दोन नेते एकत्र भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होतेच. तशी आमच्यातही झाली. महापालिका निवडणुकीत एकत्र यायचं की नाही याचा निर्णय राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच घेतील, असे सूचक वक्तव्य भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केले आहे.

मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही भेट होती. सर्व पक्षाच्या नेतृत्वाने सहकार पॅनेल सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून बँकेची निवडणूक झाली पाहिजे हा सर्वांचा प्रयत्न होता. त्याबाबतीत राज यांच्याशी चर्चा केली. या संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि त्यांचे फोनवर बोलणे करून दिले. प्रविण दरेकर लवकरच राज ठाकरेंना भेटायला येतील. राज ठाकरे सहकार पॅनलसोबत येतील ही अपेक्षा आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मदत होईल, असेही प्रसाद लाड यांनी सांगितले आहे.

गेल्याच महिन्यात देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंना भेटले होते. आता आमच्यासमोर जिल्हा बँकेचा विषय आहे. सहकार पॅनल निवडून आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सहकारात राजकारण नको. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आमच्यासोबत आली. तसंच मनसेही सोबत यावी ही अपेक्षा आहे. सहकारातून सहकार्य करण्यासाठीच सहकार असतो. त्याचा अर्थ तोच असतो. तोच प्रयत्न होत आहे. मनसे नेत्या रिटा गुप्ता आणि इतर नेते उद्या आमची भेट घेतील. त्यानंतर दरेकर आणि नलावडेंची भेट घेऊन ते पुढचा निर्णय जाहीर करतील, असेही प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!