Share

‘संजय राऊत डबल ढोलकी व्यक्तिमत्त्व, खुर्ची टीकवण्यासाठी काहीही करायला तयार’

Published On: 

सातारा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) काल सातारा जिल्ह्यातील फलटणच्या दौऱ्यावर होते. फलटण येथील भाजपच्या (BJP) कार्यक्रमात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाना साधत टीका केली आहे.

संजय राऊत यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती. या भेटीवरुनच चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत हे डबल ढोलकी व्यक्तिमत्त्व आहे. खुर्ची टीकवण्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)आल्या की त्यांच्या सुरात सूर मिसळायचे आणि राहुल गांधी आले की त्यांच्या सुरात सूर मिसळायचे हे एवढेच राऊतांचे काम आहे. अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

तसेच ममता बनर्जी यांनी युपीए कुठं आहे असा प्रश्न विचारला होता त्यावेळी संजय राऊत त्यांच्या बाजूला होते. राहुल गांधी वर्षाचे सगळे दिवस परदेशात असतात, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतून डोळे वटारले असतील त्यामुळे लगेच त्यांची समजुत घालायला संजय राऊत गेले असतील अशी जहरी टीका चंद्रकांत पाटील यांनी फलटण येथील कार्यक्रमात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!