सातारा: फलटण तालुका आणि शहराच्या भाजपच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आयोजित एका कार्यक्रमात भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) उपस्थित होते. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. यावेळी भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, अनुप शहा आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टिकास्त्र सोडले. ते म्हणाले, ज्यांनी आमच्या जीवावर अठरा खासदार निवडुन आणलेत ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्न बघत आहेत. देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं, गेल्या दोन वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गणा करु नयेत, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. संजय राऊत तर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पंतप्रधान करायला निघालेत तर कधी शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान होतील, अशा गर्जना करत आहेत. शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात, असा खोचक टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- जॅकलीनच्या अडचणीत वाढ; ईडीने समन्स बजावल्यानंतर दिल्ली कार्यालयात हजर
- महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप एकत्र?, प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
- नागालँड घटनेतील जखमी व्यक्तीने अमित शहांचा दावा फेटाळला, म्हणाला, ‘इशारा न देताच…’
- जडेजा की अश्विन, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कोणाला मिळणार संधी?
- अखेर शेतकरी आंदोलन स्थगित, मात्र…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

