उस्मानाबाद: कोरोनाचा कहर जिल्ह्यात वाढत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यात अतिगंभीर रूग्णांसाठी ‘संजीवनी’ ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यासाठी नातेवाईकांची मोठी धावपळ सुरू आहे. तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन आणण्यासाठी नातेवाईकांना सक्ती करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूमकडे अनेक तक्रारी धडकल्या होत्या. याची दखल घेवून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी रूग्णांसह नातेवाईकांना रेमडेसिविर आणण्याची सक्ती करू नये. तसेच हॉस्पिटलने स्वत: हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यात कोविड १९ रूग्णांवर उपचार करणाऱ्या रूग्णालयांमध्ये शासनाकडून वेळोवेळी प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. शासनाकडून जिल्ह्यास प्राप्त होत असलेल्या रेमडसेसिविर इंजेक्शनचे त्या-त्या रूग्णालयाच्या क्षमतेनुसार व मागणीनुसार करण्यात येत आहे. दररोज वाटप करण्यात आलेल्या इंजेक्शन्सची रूग्णालयनिहाय यादी समितीकडून प्रसिध्द करण्यात येत आहे.
त्यामुळे ज्या रूग्णालयात कोरोनाग्रस्त रूग्ण उपचार घेत आहेत, त्या रूग्णालयांनी स्वत: त्या रूग्णास रेमडेसिविर इंजेक्शन व औषधे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र अनेक रूग्णालयाचे नातेवाईकांना बाहेरून रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यासाठी सक्ती करत आहेत. जिल्हाधिकरी कार्यालयातील हेल्पलाईन क्रमांकावर याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘अशा’ धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे – जयंत पाटील
- आज रंगणार केकेआरविरुद्ध आरआरमध्ये सामना ; दोन्ही संघांची आहे एकसारखीच स्थिती
- ‘संजय राऊत यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करावी’
- ‘कमी स्कोअरची खेळपट्टी आयपीएलची मजा घालवू शकते…’ ; स्टोक्सने व्यक्त केली नाराजी
- ‘रिकामी घरे, बंगले, हॉल, गाळे कोरोना रुग्णांसाठी द्या’; भरत जाधव यांचे नागरिकांना कळकळीचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

