🕒 1 min read
नागपूर: शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरु आहे. त्यानिमित्ताने शिवसेना खासदार संजय राऊत नागपुरात दाखल झालेले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. दरम्यान ईडी च्या कार्यवायांसंबंधी पत्रकाराने प्रश्न विचारला असता केंद्रीय तपास यंत्रणांचा खुळखुळा झालेला आहे आणि सगळ्यांना तो दाखवून घाबरवले जात आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
“हे एक राजकीय षडयंत्र आहे. जिथे भाजपचे राज्य नाही, भाजपचे मुख्यमंत्री नाहीत, फक्त तिथेच ईडीच्या कारवाया होत आहेत. युपीए सरकारच्या काळात १० वर्षात फक्त २३ धाडी पडल्या होत्या. परंतु गेल्या सात वर्षात जवळपास २३ हजार धाडी पडल्या”, असा आरोप राऊत यांनी भाजपवर केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
