मुंबई : मुंबईत मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार आहे.शिवसेनेनं मुंबईमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा भाजपच्या टीकेनंतर भलतीच चर्चेत आली आहे.
भाजपच्या टीका सत्रानंतर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अजानच्या बाबतीत बोलणाऱ्यांनी स्वतःच्या बुडाखाली काय आणि किती जळतंय हे बघावं’ असा जहरी प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे. तसेच, देशात बेरोजगारी, शेतकरी आंदोलने असे अनेक महत्वाचे विषय असून धार्मिक राजकारण करू नये असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
अजान पठण स्पर्धेमागील कल्पना काय?
या स्पर्धेचे आयोजक शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी या स्पर्धेसंदर्भात टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली होती. ‘मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. अजानमध्ये प्रचंड गोडवा असून अजानचं मला नेहमीच अप्रूप वाटत राहिलं आहे. त्यामुळेच मुस्लिम समाजातील मुलांसाठी अजानची स्पर्धा घेण्याचं माझ्या मनात आलं. अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षिस देण्यात येईल. या स्पर्धेचा खर्च शिवसेना करणार आहे,’ असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
-
‘उद्धव ठाकरेंना आव्हान देणं योगींना कधीच जमणार नाही’
-
‘मिळाली सत्ता घ्या गपगुमान ही काँग्रेसची अवस्था’
-
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
-
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीत बीड जिल्ह्यात झाले ‘एवढे’ मतदान
-
भाजप खासदाराचा कोरोनामुळे मृत्यू तर ‘या’ खासदाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
