Share

Navneet Rana : संजय पांडेंनंतर संजय राऊत आणि अनिल परब यांना अटक होणार; नवनीत राणा यांच्या विधानाने खळबळ

Published On: 

🕒 1 min read

Navneet Rana । मुंबई : काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली. संजय पांडे यांनी दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात आज तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. सध्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरू असून ईडीने त्यांना आज दिल्लीमध्ये अटक केली आहे. यानंतर याबाबत आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याबाबत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय पांडे यांच्या नंतर आता पुढचा नंबर शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते अनिल परब यांचा आहे. या दोघांना अटक होणार, असं विधान नवनीत राणा यांनी केलं आहे. तसेच पुढे जेव्हा ईडी कुणावरती कारवाई करते, तेव्हा ती पूर्ण पुरावे आणि साक्षीनिशी करते. पुराव्याशिवाय ईडी कडून कोणतीही कारवाई केली जात नाही. संजय पांडे यांच्या नंतर महाराष्ट्रात खूप नेत्यांचे नंबर येणार आहेत.

दरम्यान, मागच्या सहा-सात महिन्यातले दिवस पाहिल्यास अनिल परब यांची अनेकदा ईडी कडून चौकशी झाली आहे. अनिल परब यांनी दिलेली उत्तरही ईडी साठी समाधानकारक नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा चौकशीला बोलावलं जात आहे. तसेच संजय राऊत यांचीही अनेकदा ईडीकडून चौकशी झाली आहे. त्यांना ईडीचे अनेकदा नोटीसा येत आहेत, असंही राणा म्हणाल्या. मात्र राणा यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा शिवसेना विरुद्ध राणा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!