Share

भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर अपमानित होण्याची वेळ- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:  भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने व्वातावर्ण चांगलेच तापले आहे. तर ‘‘आमच्या प्रेषितांचा अपमान करणाऱ्यांना उडविण्यासाठी आमच्या शरीरावर स्फोटके बांधू. या चुकीसाठी कोणतीही माफी, कोणतीही सुरक्षा व्यवस्था त्यांना वाचवू शकणार नाही,’’ अशी धमकी ‘अल कायदा’ने दिली. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत टीका केली आहे.

भाजपामुळे देशाची जगात नामुष्की तर झालीच, पण देशातील जनतेच्या जिवाशी खेळ सुरू झाला. आधीच ती महागाई, बेरोजगारीमुळे मरते आहे. त्यात आता आत्मघातकी हल्ल्यांचे भय. सरकार काय करते? सरकार फक्त आपल्या गोटातील लोकांना सुरक्षा पुरवते. पैगंबरांच्या अपमानासंदर्भात देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री कोणताही खुलासा करायला तयार नाहीत. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर अपमानित होण्याची वेळ आली. हा प्रश्न हिंदू-मुसलमानांचा नाही, तर हिंदूंच्या सहिष्णुतेचा आहे. निदान याप्रश्नी सरसंघचालक मोहन भागवत यांनी तरी परखड भूमिका घ्यायला हवी, पण एरवी बोल बोल बोलणारेही येथे गप्प बसले आहेत. बाबरी प्रकरणानंतर मुंबईत बॉम्बस्फोट घडवून रक्तपात केला गेला. त्या जखमांचे व्रण आजही भळभळत आहेत. आता हे नवे प्रकरण उपटले आहे. ही आग शांत करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. पंजाबात खलिस्तानच्या घोषणा व झेंडे फडकविण्याचे धंदे सुरू झाले आहेत. कश्मीरात तर वणवाच पेटला आहे. या दोन्ही तणावांवर सरकारला तोडगा काढणे जमत नाही. केंद्रातील सरकार व त्यांचे सूत्रधार पूर्णवेळ सत्तामग्न व निवडणूकमग्न झाले आहेत. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!