मुंबई: भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. यानंतर भारतातच नाही तर जगभरातून याचे पडसाद उमटत आहेत. त्यातच अल-कायदा या दहशतवादी संघटनेने भारतातील अनेक शहरात दहशतवादी हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या समाना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.
अल कायदाने महाराष्ट्रासह देशभरात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची धमकी दिली आहे. भारतीय जनता पक्षाने मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत जे अपमानकारक वक्तव्य केले, त्यामुळे ‘अल कायदा’सारख्या संघटनांनी सरळ धमक्या द्यायला सुरुवात केली. देशातील अनेक शहरांत आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवू असे ‘अल कायदा’चे इशारे आहेत. ‘अल कायदा’ची धमकी ही भारतीय जनता पक्षाने ओढवून घेतलेली बला आहे. झोपी गेलेल्या सैतानाला जागे करण्याचे काम भाजपाने केले आहे व उद्या मुंबई-महाराष्ट्रात ‘अल कायदा’ने काही विध्वंसक कृत्य केले व त्यात निरपराध लोकांचे रक्त सांडलेच तर त्याची सर्वस्वी जबाबदारी भारतीय जनता पक्षाची राहील. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मोहम्मद पैगंबरांविषयी ज्या प्रकारचे वक्तव्य भाजपातर्फे करण्यात आले, त्याचे समर्थन कोणीच करू नये. दुसऱ्या धर्मप्रमुखांचा असा अपमान हिंदुत्वासाठी मान्य नाही; पण भाजपाला असे वाटते की, ते म्हणजेच देश व ते म्हणजेच हिंदुत्व. आज पैगंबर अपमानप्रकरणी भारत देशावर माफीची नामुष्की तर ओढवलीच, पण ‘अल कायदा’सारख्या संघटनांनी दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे. ही धमकी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मोहम्मद पैगंबरांच्या एका व्यंगचित्रावरून फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ले झाले व त्याचे पडसाद मुंबईसह देशभरात उमटले. असा हवाला देत संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “ज्या पक्षाने माझ्यासारख्या अतिसामान्य…”, अमोल मिटकरी यांचे मोठे वक्तव्य
- IND vs SA 2022 : दक्षिण आफ्रिकेसमोर भारताच्या गोलंदाजांनी पत्करली शरणागती, ७ गडी राखून पराभव
- IND vs SA 2022 : ईशान किशनची दमदार अर्धशतकीय खेळी, आफ्रिकेला २१२ धावांचे लक्ष्य
- “सीता मातेचे चीरहरण…” ; रणदीप सुरजेवाला यांची जीभ घसरली, भाजपची टीका
- IND vs SA 2022 : दक्षिण आफ्रिकेच्या संघातून वाईट बातमी, ‘या’ खेळाडूचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

