मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना २१२ धावांचा डोंगर उभा केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताकडून ईशान किशनने दमदार अर्धशतकिय खेळी केली.
भारताचा डाव
दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेंबा बवुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी भारतीय संघ मैदानावर उतरला. सलामीला ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनीही डावाची चांगली सुरुवात करत पावरप्लेमध्ये अर्धशतकी भागीदारी रचली. यानंतर ऋतुराज गायकवाड २३ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयश अय्यरने ईशान किशनसोबत संघाची धावसंख्या शंभरीपार पोहचवली. ईशान किशनने ४८ चेंडूत ३ षटकार आणि ११ चौकारांच्या सहाय्याने ७६ धावांची दमदार खेळी खेळली. आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराजच्या फिरकित ईशान किशन फसला आणि बाद झाला. यानंतर श्रेयश अय्यरही ३६ धावा करून बाद झाला. कर्णधार ऋषभ पंत २९ धावा आणि हार्दिक पंड्या ३१ यांनी संघाची धावसंख्या २०० पार पोहोचवली. हार्दिक पंड्याने १२ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकार यांच्या सहाय्याने ३१ धावांची तुफानी पारी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना केशव महाराज, एनरिक नॉर्किया आणि ड्वेन प्रिटोरियस यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
???????????????????????????? ????????????????????!
A superb batting show by #TeamIndia to post 211/4 on the board. ???? ????
Over to our bowlers now. ???? ????
Scorecard ▶️ https://t.co/YOoyTQmu1p #INDvSA | @Paytm pic.twitter.com/Sz0FovFdcU
— BCCI (@BCCI) June 9, 2022
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेंबा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे.
भारत – इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

