Share

“या देशात नेहरू-गांधी नावाचे काही शिल्लक ठेवायचे नाही असा…”, संजय राऊतांचा भाजपवर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:  ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी ईडीकडून काँग्रेस नेते राहुल गांधी तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी सुरु आहे. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून राहुल गांधी यांना छळायचे व आम्ही त्यांचा छळ करू शकतो याचे प्रदर्शन घडवायचे, विरोधात उठलेला प्रत्येक श्वास बंद करायचा हीच नवी लोकशाही उदयास आली असल्याचे म्हटले आहे.

भाजपला पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या स्मृती फक्त नष्टच करायच्या नाहीत, तर त्या परिवाराची वंशवेलही कायमची संपवून टाकायची आहे. या देशात नेहरू-गांधी नावाचे काही शिल्लक ठेवायचे नाही, असा विडा उचलूनच राष्ट्रीय कार्याची दिशा ठरवली गेली आहे. हे सूडाचे राजकारण आहे. सत्ता ही विनयाने वापरायची असते, राष्ट्रकल्याणासाठी तिचा अंमल करायचा असतो. राजकीय लढाया निवडणुकीच्या आखाडयात लढायच्या असतात. हीच या देशाची परंपरा आहे. आज राजकीय लढाया कुटुंब उद्ध्वस्त करण्यापर्यंत पोहोचल्या. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

राजकीय विरोधकांना पाणीही मागू द्यायचे नाही, अशा पद्धतीने हल्ले सुरू आहेत.  बुलडोझर फक्त घरांवरच फिरतो असे नाही, तो व्यक्तीच्या नागरी अधिकारांवर आणि देशाच्या स्वातंत्र्यावरही फिरताना स्पष्ट दिसत आहे. आज राहुल गांधी, उद्या सोनिया गांधी, त्यानंतर आणखी कोणी! विरोधकांना खतम करण्यासाठी हिटलरने ‘ज्यू’च्या कत्तली केल्या तसे ‘विषारी गॅस चेंबर्स’ निर्माण करणे तेवढेच बाकी आहे. राजकीय सूडाची पावले त्याच दिशेने पडत आहेत. देशात कायद्याचे राज्यच राहिले नाही, तेथे ‘कायदा सगळ्यांसाठी समान’ या बोलण्यास काय अर्थ? असा सवालही राऊत यांनी भाजपला केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!