यवतमाळ : शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केलेत. राठोड वनमंत्री असताना शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे केली होती. या आरोपामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
यवतमाळ पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करत आहे. महिलेने तक्रार केल्यानंतर दि. १४ ऑगस्ट रोजी तिने घाटंजी पोलीस ठाण्यात कुटुंबासह जाऊत एसआयटीसमोर महिलेचा जबाब नोंदवला होता. य महिलेची बंददाराआड दोन तास चौकशी करण्यात आली.
आता यानंतर उद्या बुधवारी, दि.१८ ऑगस्ट रोजी खुद्द आमदार संजय राठोड यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. संजय राठोड यांची बाजू ऐकल्यानंतर एसआयटी कमिटी दोन्ही जबाब तपासून अहवाल सादर करणार आहे. संस्थेत नोकरी मिळावी म्हणून माझ्या चारित्र्यावर बोट दाखवण्यात आले आहेत. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. सध्या या संस्थेशी माझा संबंध नाही. केवळ वैफल्यातून हे आरोप करण्यात आले आहेत. माझं राजकीय करिअर संपवण्याचा हा प्रयत्न आहे, असे संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता.
तर दुसरीकडे संजय राठोड यांच्या मंत्रिपदाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात. कारण, बंजारा समाजातचे धर्मगुरू आणि पोहरादेवीचे मुख्य पिठाधीश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले आहेत. मिळालेल्या माहितीनूसार पोहरादेवीचे मुख्य पिठाधीश बाबूसिंग महाराज सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेटण्यासाठी बाबूसिंग महाराज गेल्याची माहिती पोहरादेवी संस्थानच्या सूत्रांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परळीतील त्या अंगार, भंगारवाल्या घोषणा मी ऐकल्याच नाहीत’, मंत्री भागवत कराडांची प्रतिक्रिया
- मुंडे भगिनी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटोच गायब!
- नाराजी कायम! मंत्री भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेकडे मुंडे समर्थकांची पाठ
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, मनसेची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
