Share

संजय राठोड यांची नियमांनुसार चौकशी होणार; गृहमंत्र्यांचं आश्वासन

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : गेल्या आठवड्यात पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाले आहेत. त्यावरुन पूजाने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून जीवन संपवल्याचा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.

यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणात भाजपकडून मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे. एवढेच नाही तर पूजा चव्हाण यांच्या संवादाच्या टेप्स बाराखडी पोलिसांकडे दिल्या असल्याचेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

याकाळात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी पोलिसांच्या तपासावर अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधत पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलं आहे. ‘संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन चौकशी करण्याची मागणी भाजपाकडून होत आहे. मात्र, संजय राठोड यांची नियमांनुसार चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार त्याबाबतचा निर्णय घेईल. तसेच पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत,’ अशी माहिती अनिल देहमुख यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!