🕒 1 min read
मुंबई : जवळपास तीन महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.
मात्र, देशाबाहेरील कलाकारांनी या आंदोलनावर भाष्य केल्यानंतर भारतातील सेलिब्रिटींच्या एका गटाने म्हणजेच सचिन तेंडुलकर , लता मंगेशकर यांचा समावेश होता. देशातील एकता जपणं महत्वाचं असल्याचं म्हणत बाहेरच्या सेलिब्रिटींनी यात नाक खुपसू नये अशी समज त्यानी दिली होती. इंटरनॅशनल पॉप स्टार रिहाना, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांच्यासह माजी अडल्ट स्टार मिया खलिफा हिनं देखील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं.
दरम्यान, केंद्र सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केलेल्या सेलिब्रिटींच्या ट्विटचा आशय सारखाच आहे. हा आशय सारखा असल्याने त्यांना कोणी हे करायला सांगितले का ? असा सवाल सामान्यांमध्ये उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
यानंतर भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सडकून टीका केली होती. यामुळेच कि काय आता देशमुख यांनी भूमिका बदलेली असल्याचे पाहायला मिळत आहे. लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना संपूर्ण देशच दैवत मानतो. मी त्यांच्या चौकशीची भाषा कधीही केली नव्हती. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मला भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु, असे म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.
या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी सोमवारी आपली बाजू स्पष्ट केली. सेलिब्रिटींच्या ट्विटबाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी म्हणालो, भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु, पण माझ्या तोंडी लता मंगेशकर, तेंडुलकर यांची चौकशी करणार अशी वाक्यं घालण्यात आली, असे देशमुख यांनी म्हटले.
माझा आदेश हा भाजपच्या आयटी सेलची चौकशी करण्यासाठी होता. त्यांनी काही स्क्रिप्ट दिली का? दिल्लीमध्ये आम्ही जी चौकशी केली, त्यामध्ये भाजप आयटी सेलचे प्रमुख आणि १२ इन्फ्ल्युएन्सरची नावं समोर आली आहेत. त्यांची रितसस चौकशी सुरु असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- पी. बी. सावंत यांचे पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीतील कार्य सदैव स्मरणात राहील – मुख्यमंत्री
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- हिरकणीनंतर आता सोनाली कुलकर्णी झळकणार आणखी एका शौर्यगाथेत
- ‘सतत टीका करणे योग्य नाही’, चेन्नईच्या पिचला नावं ठेवणाऱ्यांना गावसकरांचं चोख उत्तर
- कोणी काहीही बोलू द्या, मी संयमाने जनतेची कामे करतो-आ.संदिप क्षीरसागर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

