Share

संजय राठोड-पूजा चव्हाण यांचे संभाषण पोलीसांच्या हाती?

Published On: 

पुणे: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुणे पोलिसांना माजी मंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे कॉल रिकॉर्डिंग आढळून आले आहेत. हे संभाषण पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या आधी पाच-सहा दिवसांपूर्वी करण्यात आले होते. त्यातील एक संभाषण ९० मिनिटाचे असल्याचे कळाले आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात राहत्या घरावरून उडी मारली होती. तिच्या आत्महत्याप्रकरणात शिवसेनेचे माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव सातत्याने घेतले जात होते. भाजपने या मुद्द्यावरुन संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तेव्हा राठोड यांनी २८ फेब्रुवारीला राजीनामा दिला होता. तेव्हापासून पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पुणे पोलीसांकडून तपास सुरु आहे.

पूजाने सर्व कॉलचे रिकॉर्डिंग केली आहे. संभाषण बंजारा भाषेमध्ये झाले होते. पोलीस या संभाषणाचे ट्रान्सलेशन करुन घेत आहेत. संजय राठोड ज्या बंजारा समाजातून येतात, त्याच समाजातून पूजा चव्हाण येते. तिचे आणि आमदार संजय राठोड यांचे प्रेमसंबंध होते असा आरोप आहे. पूजा मुळची बीड जिल्ह्याची असून टी पुणे येथे एक कोर्स करत होती. दरम्यान पूजाचा फोन पुण्यातील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आला आहे.याची पुढील चौकशी सुरु असल्याचे कळते आहे.पूजा चव्हाणच्या आत्महत्येपूर्वी २४ तासाआधीचे यवतमाळ मेडिकल कॉलेज परिसरातील सीसीटीव्ही फूटेजही लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. फूटेजमध्ये पूजा आणि संजय राठोड यांचा जवळचा साथीदार अरुण राठोड आहे. यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये पूजा अरुण राठोड नावाच्या एका मुलीचे ऑपरेशन झाले होते. ही महिला पूजा चव्हाणच असल्याचा संशय असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या प्रकरणी पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!