मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर निशाणा साधलाच पण शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही चांगलेच सुनावले आहे.
“ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. मागच्याच्या मागच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते की, शेतकऱ्यांची वीज कापली जाणार नाही. मात्र हे सपशेल फेल ठरले आहे. आज अनेक शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिली नाही.”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
दरम्यान उद्यापासून विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे.यात शेतकरी, वीज तोडणी, तसेच कर्ज माफी अशा अनेक मुद्द्यांवर भाजप ठाकरे सरकारला घेरणार आहे. तसेच मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर उद्याचे अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशाराही भाजपने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“…तर अधिवेशनाचे कामकाज होऊ दिले जाणार नाही”, मलिकांच्या राजीनाम्यावरून भाजप आक्रमक
“दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु”, फडणवीसांचा दावा
‘नोटिसा पाठवून इलेक्शन फंड जमा करतात’; मनसे आमदार राजू पाटलांचा डोंबिवली महापालिकेवर आरोप
“विराट कोहली कर्णधार असताना…”; भारताच्या दिग्गज माजी फलंदाजाचे मोठे विधान
“प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय राहणार नाही”; आर्यन खान प्रकरणावर संजय राऊत आक्रमक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

