Share

‘मध्यमवर्गीयांना पॅकेज देऊन मगच हा लॉकडाऊन लावा,नाहीतर मोठ्या उद्रेकाला सामोरं जावं लागेल’

Published On: 

मुंबई : नव्या कोरोना रुग्णांचा राज्यातील वाढता आकडा पाहता आता याचा ताण आरोग्य यंत्रणांवर येऊ लागला आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. राज्यातील अनेक शहरांत बेड्सची संख्या अपुरी पडू लागले आहेत.

याच धर्तीवर रविवारी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत राज्यात लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे सरकार राज्यात लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीला पुन्हा लॉकडाऊन लागावा, असे वाटत नाही. पण आपल्याकडे ‘तहान लागल्यावर विहीर खोदायची’, अशी एक म्हण आहे. तशी परिस्थिती ओढावू नये म्हणून आपण तयारी करत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसरीकडे भाजपने टाळेबंदीला विरोध दर्शविला आहे. रोजंदारी मजुरांना आणि मध्यमवर्गाला पॅकेज न देता पुन्हा लॉकडाउन लागू केला तर महाराष्ट्राला मोठ्या उद्रेकाचा सामना करावा लागेल, असा इशारा भाजपा महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे जी यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिला.

संजय पांडे म्हणाले,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी पुन्हा लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. उद्धवजी लॉकडाउन हा काही कोरोनाचा उपाय नाही. गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडी सरकार कोविडची हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात अपयशी ठरलं आहे. याचा परिणाम असा झाला की जेव्हा महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला बेड व व्हेंटिलेटरची कमतरता दिसून येते. रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत असं त्यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, आपण एक नारा दिला होतात, माझं कुटुंब माझी जबाबदारी… मी जबाबदार.. होय उद्धवजी महाराष्ट्राच्या जनतेला बेड्स ची कमतरता दिसून येतेय तर त्याची जबाबदारी आपल्यावर आहे. तरीही आपल्याला जर लॉकडाउन लावायचे असेल तर आमचे रोजंदारी मजूर, आमची मिडल क्लास फॅमिली यांच्या खाण्यापिण्याची, औषधांची व्यवस्था करून, त्यांना एक पॅकेज देऊन मगच हा लॉकडाऊन लावा. नाहीतर महाराष्ट्राला एका मोठ्या उद्रेकाला सामोरं जावं लागेल. आणि त्याची पूर्ण जबाबदारी उध्दवजी आपली असेल असं त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!