नांदेड : ‘हल्ला बोल’ मिरवणूकिला पोलिसांकडून परवानगी नाकारल्या नंतर शीख बांधव व नांदेड पोलिसांमध्ये काल तणाव निर्माण तणाव निर्माण झाला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मिरवणुकीला परवानगी नसतानाही काही तरुणांनी मिरवणुकीची तयारी केली होती. याच दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पोलीस आणि तरुणांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. यात जमावाच्या हल्ल्यात या परिसरात उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
काही हल्लेखोरांनी पोलीसांशी हुज्जत घालून बॅरिगेट्स तोडले. चौरस्त्यावर घटनेचे शूटिंग करणाऱ्या अनेकांचे मोबाईल या वेळी फोडण्यात आले. पोलीस उप-अधिक्षक यांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत सुमारे अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर ३० ते ४० मोबाईल फोडण्यात आले. डीवायएसपीवरही जीवघेणा हल्ला झाला आहे.
दरम्यान,हल्लेखोरांनी पोलिसांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या, टायरमधील हवा काढून टाकली तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. यामुळे सदर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत ४०० नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. आपल्या ट्वीट मध्ये ते म्हणतात, काल नांदेडमध्ये पोलिसांवर झालेला हल्ला निंदनीय आहे.लॉकडाऊनच्या कडकपणाचा निषेध करण्यासाठी तरुण शीखांनी तेथील पोलिसांवर तलवारी उपसल्या.या घटनेचे समर्थन होऊ शकत नाही.परंतु सरकार कोरोनाच्या नावाखाली करत असलेल्या वेडेपणामुळे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू शकतात असे निरुपम यांनी म्हटले आहे.
नांदेड़ में पुलिसवालों पर कल हुआ हमला निंदनीय है।#लॉकडाउन की सख्ती के विरोध में नौजवान सिखों ने वहाँ पुलिसवालों पर तलवारें खींच दी थी।
इस घटना का समर्थन नहीं किया जा सकता।
लेकिन #कोरोना के नाम पर सरकार जिस तरह का पागलपन कर रही है,उससे ऐसी प्रतिक्रियाएँ और हो सकती हैं।#Nanded pic.twitter.com/qvjCKOMyfA— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) March 30, 2021
दरम्यान, या घटनेचा सोशल मीडियात व प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. त्यामुळे समाजमाध्यमातुन मोठ्या प्रमाणात जाहीर निषेध होत असून आरोपींना तात्काळ अटक करून शिक्षा व्हावी अशी मागणी होताना पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपचं ठरल ! ‘हा’ नेता उद्या भरणार उमेदवारी अर्ज
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- नांदेड जिल्हा; सिलिंडरच्या स्फोटात ३ घरे भस्मसात
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

