🕒 1 min read
नांदेड : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा पादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी लावण्यात आली आहे. पण या संचारबंदीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील ताकबीडमध्ये २८ मार्च रोजी सकाळी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन तीन घरे भस्मसात झाली. त्यात अंदाजे साडे दहा लाख रूपयांचे नुकसान झाले. होळीच्या दिवशीच तिघांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे.
ताकबीड येथे मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारे संभाजी मंडलापुरे यांच्या घरातील सिलिंडरचा रविवारी, २८ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता स्फोट झाला. त्यामुळे त्यांच्या घराला आग लागली. पाहता पाहता ही आग संभाजी किशन मंडलापुरे, हानमंत ईरबा मंडलापुरे, श्रीमती राधाबाई किशन मंडलापुरे या तिघांच्या घरात पसरली.
या आगीत कौलारु घरासह गहू,तांदूळ, ज्वारी, दाळीसह कपडे, घरातील भांडे व कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, हरभरा ५ क्विंटल, फ्रीज, कुलर, लॅपटॉप, शासकीय कागदपत्रे, शालेय साहित्य असे अंदाजे साडे १० लाख रूपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे मंडलापुरे कुंटुबीयांचा संसार उघड्यावर आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजकीयदृष्टय़ा कमालीचे जागरुक असलेले मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील’
- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देखील शरद पवारांची फोनद्वारे विचारपूस !
- ‘मोदींचा दौरा संपल्यावर धर्मांध मुसलमानांनी दंगली सुरू केल्या, बांगलादेश दौऱ्याचे हे फलित आहे’
- ‘बांगलादेशातील अत्याचार पाहून झोप न लागणारे मोदी हळवे, दयाळू व संवेदनशील असल्याचे हे लक्षण आहे’
- भाऊ युसूफ पठान पाठोपाठ इरफानही कोरोना पॉझिटिव्ह!

