मुंबई : कार्तिक आर्यन हा बॉलीवूडचा नवा चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाउ लागला आहे. काही दिवसापुर्वी करण जोहरने त्याला ‘दोस्ताना २’ या चित्रपटातुन बाहेरचा रस्ता दाखवला होता. यानंतर कार्तिक आर्यनच्या मदतीला सुप्रसिद्ध निर्माता साजिद नाडियाडवाला पुढे सरसावले आहे. त्यानी कार्तिक आर्यनला त्याच्या नविन चित्रपटात संधी दिली.
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनसोबत झालेल्या वादामुळे कार्तिक आर्यनला ‘दोस्ताना २’ चित्रपटातुन बाहेर काढण्यात आले. याप्रकरणानंतर निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी त्याला संधी दिली आहे. एका नव्याकोऱ्या प्रेमकथेमध्ये कार्तिकला भूमिका मिळाली आहे. महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन हे प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक समिर विद्धंस हे करणार आहे. या चित्रपटात जरी कार्तिक रोमँटिक हिरोच्या भूमिकेत असला तरी त्याची भूमिका ही यावेळी वेगळी असेल अशी माहिती समोर येत आहे.
या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. मागील वर्षी साजिद नाडियाडवाला यांच्या ‘छिछोरे’ चित्रपटाला बेस्ट फिचर फिल्म तर समीर विध्वांस यांच्या ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटासाला बेस्ट फिल्म ऑन सोशल इश्यू असे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. आता हे दोघे एकत्र काम करत असल्याने नक्कीच काहितरी चांगली कलाकृती बघायला मिळेल अशी अपेक्षा प्रेक्षक करत आहे. मात्र या चित्रपटातील अभिनेत्रीचे नाव अजुनही निश्चित झालेले नाही.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तरीही मराठी कलाकारांच्या योगदानाबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो’
- ‘मी माझा संसदेतील मित्र गमावला’, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
- ‘एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त!’, शरद पवारांच्या शोकभावना
- ‘बायको अशी हव्वी’, बघा पुढील आठवड्यापासून कलर्स मराठीवर
- असाध्य ते साध्य! राजीव सातव यांचा हिंगोली ते दिल्ली राजकीय प्रवास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

