मुंबई : राज्याचा कारभार जिथून चालवला जातो, त्या मंत्रालयात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. मंत्रालयात राजपात्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस हे एक रुम आहे. तिथे हे धक्कादायक चित्र आढळून आले.
‘महाराष्ट्राच्या मंत्रालयाला तुम्ही कशाला बदनाम करताय? मंत्रालयात काही तरी बाटल्या सापडल्याचं भाजपचं म्हणणं आहे. त्याचा आम्हाला दिल्लीतून वास येत नाही तेवढा. आम्हाला कोणता वास काय कळत नाही. आता कोण वास घ्यायला गेलंय बाटल्यांचा हे पाहावं लागेल. पण मला कोण्या तरी अधिकाऱ्याने सांगितलं की या साधारण दीड वर्षांपूर्वीच्या बाटल्यांचा हा खच आहे. या बाटल्या आताच्या नाही दीड वर्षापूर्वीच्या आहेत. कदाचित आमचं सरकार नसावं त्यावेळेला. या मधल्या संपूर्ण काळामध्ये मंत्रालयात कुणाचा वावर नव्हता. वर्षभर तर मंत्रालय बंदच होतं. आता हळूहळू सुरू झालं आहे. माणसं जात आहेत. आता या कोणत्या काळातील बाटल्या पडल्यात हे तपासण्यासाठी भाजपने त्या लॅबमध्ये पाठवाव्यात. किती जुन्या आहेत याचा शोध घ्यावा, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.
यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी राऊतांचे कान ओढले आहे. ते म्हणले, ‘याचा अर्थ ठाकरे सरकार आल्यापासून मंत्रालयाची आतून साफसफाई दीड वर्षांनी झाली नाही की काय? संज्या राऊतचं हे वक्तव्य बघून असं वाटतं त्या सगळ्या बाटल्या संज्यानेच रिकाम्या केल्या आणि नशेत मीडियासमोर आला कारण रिकाम्या बाटल्या तपासायचं लॅब असतं हे आज कळलं.’ असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आजारी माणसाला गोळी दिली पण अर्धीच, तो बरा कसा होणार?’ ; शिवसेनेचा सवाल
- पुराशी सामना केल्यानंतर आता डेल्टा प्लसने कोल्हापूरकरांची चिंता वाढवली
- ‘घटना दुरुस्तीला भाजपातूनच विरोध, आता फडणवीस कोणत्या तोंडाने आरक्षणावर बोलणार ?’
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- ‘चूकीचा उत्सव आणि चूक सुधारण्याचा इव्हेंट, एवढा कॉन्फिडन्स सरकारकडे येतो कुठून’, संजय राऊतांचा केंद्राला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

