Share

पुराशी सामना केल्यानंतर आता डेल्टा प्लसने कोल्हापूरकरांची चिंता वाढवली

Published On: 

कोल्हापूर : मागील महिन्यात ३-४ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीने कोल्हापूरला मोठा तडाखा दिला. आधीच कोरोनाच्या गंभीर स्थितीमुळे अधिक निर्बंधात असलेल्या कोल्हापुरात पुरामुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असून आता कोरोनाचा अतिधोकादायक व्हेरीयंट असलेल्या डेल्टा प्लसच्या रुग्णामुळे चिंतेत आणखी भर टाकली आहे.

कोल्हापुरात डेल्टा प्लसचा रुग्ण आढळले नंतर एकच खळबळ उडाली आहे. मात्र हा रुग्ण 28 मे रोजीचा असल्याची माहिती उघड झाली आहे. दरम्यान कोल्हापूर शहरातील नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियम पाळणे गरजेचे असल्याचे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासन डॉक्टर कांदबरी बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत केल आहे. दरम्यान, डेल्टा प्लसच्या सध्याच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून अहवाल येण्यास विलंब हा जीवघेणा ठरू शकतो अशी परिस्थिती सध्या कोल्हापूर शहरात निर्माण झाली आहे.

यावेळी बोलताना डॉक्टर कादंबरी बलकवडे म्हणाल्या, शासनाच्या नियमानुसार डेल्टा प्लस चे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले जातात. यामध्ये मे महिन्यातील 62 वर्षीय एका रुग्णाचा नमुना पाठवला होता. त्याचा रिपोर्ट 9 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला. यानंतर महापालिका प्रशासनाने त्या रुग्णास संदर्भात सविस्तर माहिती काढून त्याच्या संपर्कात कोण कोण आलं याची माहिती देखील घेतली. मात्र डेल्टा पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णाने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर एका महिन्याने पॉझिटिव्ह आला असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या 13 पैकी तीन जण पॉझिटिव होते व ते उपचारानंतर बरं झाले असल्याचं त्यांनी सांगितल आहे. शिवाय डेल्टा प्लस हा रुग्ण उपचारानंतर बरा झाला असून महापालिकेचा आरोग्य विभाग त्यांच्यावरती विशेष लक्ष असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!