🕒 1 min read
नवी दिल्ली : संसदेत काल १०२ व्या घटना दुरुस्तीचे विधेयक मांडण्यात आले. यामुळे राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातील मागास जातींना आरक्षण देण्याचा अधिकार पुन्हा देण्यात आला आहे. यामुळे मराठा आरक्षणाबाबत आता समाजाला नवी आशा निर्माण झाली असली तरी विरोधकांनी मात्र या घटना दुरुस्तीचा मराठा आरक्षणाला फायदा होणार नसल्याचं म्हटलं आहे.
राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे घटनादुरुस्ती विधेयक दोनतृतीयांश मतांनी मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. या दुरुस्तीमुळे मराठा समाजाला राज्याच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास यादीत समाविष्ट करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांच्या अटीचा अडसर निर्माण झाला असून भाजप खासदारांच्या आणि केंद्रीय मंत्र्यांच्या भूमिकेवर शिवसेनेनं टीकास्त्र सोडलं आहे.
काल घटनादुरुस्तीला काल लोकसभेत मतदानानंतर मंजुरी देण्यात आली. दरम्यान, मतदानावरूनच शिवसेना खासदार विनायक येउ यांनी भाजपला लक्ष्य केलं असून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे.
‘राज्यांना आरक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून दिलेल्या सूचनेवर काल संसदेत मतदान झालं. त्याला काँग्रेसने पाठिंबा दिला. पण भाजपने पाठिंबा दिला नाही. आता फडणवीसांनी सांगावं तुम्ही कोणत्या तोंडाने आरक्षणावर बोलणार आहात? कोणत्या आधारावर बोलणार आहात? भाजपचा खोटा मुखवटा काल संसदेत फाडला गेला आहे,’ असा आरोप विनायक राऊत यांनी करतानाच मराठा आणि धनगर समाजाने भाजपच्या मुखवट्यापासून सावध राहावे, असं आवाहन देखील केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आजारी माणसाला गोळी दिली पण अर्धीच, तो बरा कसा होणार?’ ; शिवसेनेचा सवाल
- पुराशी सामना केल्यानंतर आता डेल्टा प्लसने कोल्हापूरकरांची चिंता वाढवली
- निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याला वेगळा आणि सोलापूरला वेगळा न्याय का ?
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- ‘चूकीचा उत्सव आणि चूक सुधारण्याचा इव्हेंट, एवढा कॉन्फिडन्स सरकारकडे येतो कुठून’, संजय राऊतांचा केंद्राला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
