नवी दिल्ली: मंगळवारी लोकसभेत राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल करणारे घटनादुरुस्ती विधेयक दोनतृतीयांश मतांनी मंजूर करण्यात आले. आज या विधेयकासंदर्भात लोकसभेत चर्चा झाली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर निशाना साधला.चूक झाल्यानंतर तिचा इव्हेंट कसा करावा आणि चूक सुधारल्यानंतर त्याचा उत्सव करण्याचाही इव्हेंट कसा करावा, हे सरकारकडून शिकायला हवं. चुकीचाही उत्सव आणि चूक सुधारण्याचाही इव्हेंट, एवढा कॉन्फिडन्स सरकारकडे येतो कुठून? असा टोला त्यांनी केंद्राला लगावला आहे.
२०१८मध्ये १०२व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागास आयोगाला अधिकार दिल्यामुळे सर्व राज्यांचे अधिकार केंद्राला आले. तेव्हाच सगळ्यांनी इशारा दिला होता की इतके सगळे अधिकार तुम्ही एका केंद्रीय आयोगाला देऊ नका. पण सरकारने तेव्हा चूक केली होती आणि चूक झाल्यानंतर देखील सरकार आपलीच पाठ थोपटत होते असे राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान एवढा आत्मविश्वास सरकारकडे कुठून येतो. जर इतका आत्मविश्वास असेल, तर थोडा आम्हालाही उधार द्या. इथेही आत्मविश्वासाची गरज आहे असे खोचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले. आपल्या हातात नेहमीच देशाच्या संरक्षणासाठी तलवार किंवा बंदूक राहिली आहे. हेच आमचं काम राहिलं आहे. आमच्या हातात कधी तागडी-तराजू नाही आला, ना कधी चोपडी आली. आम्ही तर लढत राहिलो. सामाजिक न्यायाची अपेक्षा ठेऊन आम्ही आज उभे आहोत. असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोलापूर जिल्ह्यावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना व्यापारी महासंघाने केला तीव्र विरोध
- ‘खेळाडूंना ओळखण्यासाठी शेजाऱ्याकडून चष्मा उधार घ्यावा लागेल’, सोशल मीडियावरून मोदींवर टीका
- निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याला वेगळा आणि सोलापूरला वेगळा न्याय का ?
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- घटनादुरुस्ती विधेयकसंदर्भात बोलण्याच्या संधीसाठी संभाजीराजेंचे उपराष्ट्रपतींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

