नवी दिल्ली : संसदेत काल १०२ व्या घटना दुरुस्तीचे विधेयक मांडण्यात आले. यामुळे राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातील मागास जातींना आरक्षण देण्याचा अधिकार पुन्हा देण्यात आला आहे. यामुळे मराठा आरक्षणाबाबत आता समाजाला नवी आशा निर्माण झाली असली तरी विरोधकांनी मात्र या घटना दुरुस्तीचा मराठा आरक्षणाला फायदा होणार नसल्याचं म्हटलं आहे.
याच मुद्द्याला धरून आत शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी देखील हल्लाबोल केला आहे. ‘हे विधेयक म्हणजे आजारी माणसासारखं आहे. सरकारने आजारी माणसाला गोळी दिली. पण ती अर्धीच दिली. मग तो बरा कसा होणार?’ अशा शब्दांत त्यांनी मोडी सरकारला टोला लगावला आहे. गजानन किर्तीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आम्ही कुणाला किती टक्के आरक्षण द्यावं याची मागणी केली नाही. आरक्षणाची जी मर्यादा आहे. त्यामुळे आरक्षण देण्यात अडचणी येत आहेत.
त्यामुळे ही मर्यादा उठवून राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार द्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे. शिवसेना दुटप्पी नाही. भाजपने मराठा आणि ओबीसींच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या विधेयकातून केलं आहे. त्यामुळे आम्ही भाजपचा निषेध करतो,’ असे देखील किर्तीकर यांनी यावेळी जाहीर केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘छत्रपती आरक्षणासाठी आंदोलनात उतरले, हे कधी बघितलंय का ?,’ राऊत संसदेत कडाडले
- ‘खेळाडूंना ओळखण्यासाठी शेजाऱ्याकडून चष्मा उधार घ्यावा लागेल’, सोशल मीडियावरून मोदींवर टीका
- निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याला वेगळा आणि सोलापूरला वेगळा न्याय का ?
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- घटनादुरुस्ती विधेयकसंदर्भात बोलण्याच्या संधीसाठी संभाजीराजेंचे उपराष्ट्रपतींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

