Share

शार्दुल ठाकूर विषयी माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य

Published On: 

नवी दिल्ली : शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी माजी क्रिकेटपटू संजय बांगरने (Sanjay Bangar) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शार्दुल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्कीच स्थान मिळायला हवे, असे संजय बांगरने म्हटले आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या १८ सदस्यीय संघात शार्दुल ठाकूरचा समावेश करण्यात आला आहे. आता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते की नाही हे पाहायचे आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

एका कर्यक्रमात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेचे विश्लेषण करताना संजय बांगर म्हणाले की, शार्दुल ठाकूरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये निश्चितपणे समावेश केला पाहिजे. शार्दुल ठाकूरला नक्कीच प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल कारण भारतीय संघाने परदेशात जिंकलेल्या सर्व मोठ्या विजयांमध्ये शार्दुल ठाकूरचा मोलाचा वाटा आहे. संजय बांगरच्या मते, शार्दुल ठाकूर चेंडू आणि बॅट या दोन्ही बाजूंनी उत्तम योगदान देऊ शकतो.

शार्दुल ठाकूरने भारतीय संघासाठी आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले आहेत आणि 38 च्या सरासरीने 190 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने तीन अर्धशतकेही झळकावली आहेत आणि 67 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. ओव्हलवर इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही डावांत त्याने अर्धशतके झळकावली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!