🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केल्यापासून शिवसेना विसकळीत झाली आहे. त्यामुळे पुन्हा बांधणी करण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर काल शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भाषण करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. तसेच यावेळी व्यासपिठावर शिवसेना नेते संजय राऊत यांची जागा मोकळी होती. याच मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे ?
आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती उद्या तुमची पण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल तयारी ठेवा, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. यासंदर्भात संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.
आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती उद्या उद्या तुमची पण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल तयारी ठेवा.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 21, 2022
दीपक केसरकरांचा ठाकेंवर हल्ला-
तसेच, उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणावरून त्यांना लक्ष्य कलं जात आहे. यामध्ये भाजप मंत्री दीपक केसरकर यांनी एकीकडे दारे खुली आहेत असं म्हणायचं. दुसरीकडे पाठीमागून माणसं पाठवायची. याला संस्कृती म्हणतात का? , असा सवाल करत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. त्याचबरोबर केसरकरांनी सांगितलं, माझ्यामागे यांनी गाड्या लावल्या होत्या. मी फोन करून सांगितले. ज्याला जायचं तो खुल्यामनाने स्वाभिमानाने जातो. पाठीमागून माणसं पाठवायची ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा-
त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी सभेत शिवजयंती वरुन एक वक्तव्य केलं होतं. मात्र, ते करत असताना ठाकरे कदाचित शिवजयंतीची तारीख विसरल्याने भाजप नेते नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांना कानाखाली नाही मारायची मग काय यांची पुजा करायची? असा सवाल त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- keshav upadhye | “पेंग्विन सेनाप्रमुखांना गिधाड आणि गरूड यांच्यातला फरक कळत नाहीय”
- Jayant Dubale | कौतुक करावं तितकं कमी! नागपूरच्या जयंत दुबळेने इंग्लंड येथील नॉर्थ चॅनेल पोहून केला नवा विक्रम
- Thackeray vs Shinde | दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर कुणालाच परवानगी नाही, BMC ने अर्ज फेटाळला
- SBI Recruitment 2022 | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये ‘या’ पदांसाठी भरती
- Nitesh Rane | ” यांना कानाखाली नाही मारायची मग काय…”, नितेश राणे उद्धव ठाकरेंवर संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
