मुंबई : दसरा मेळाव्यावरुन राज्यात वातावरण तापले आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना व शिंदे गटात लढाई सुरु आहे. ही लढाई आता न्यायालयात देखील गेली आहे. शिवसेनेने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यावर आज निर्णय होणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी आज BMC ने दोन्ही गटाचे अर्ज फेटाळले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचे कारण सांगत BMC ने अर्ज फेटाळले आहेत. यापूर्वी शिंदे गटाला BKC मैदानाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टांगती तलवार आहे.
उपायुक्त परिमंडळ २ कडून शिवसेना आणि शिंदे गट या दोन्ही गटांना महापालिकेने पत्र पाठवले आहे. मुंबई पोलिसांनी अभिप्राय दिला होता, त्यावरुन ही परवाणगी नाकारली आहे. शिवाजी पार्क परिसरात दोन गटात काही दिवसांपूर्वी राडा झाला होता. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार! – उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांसह शिवसेना भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये दसरा मेळावा संदर्भात नेत्यांना आदेश देण्यात आले आहेत. यादरम्यान शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार त्यामुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता महिला आघाडी, युवा सेना, शिवसेनिकांसोबत घ्या, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- SBI Recruitment 2022 | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये ‘या’ पदांसाठी भरती
- Nitesh Rane | ” यांना कानाखाली नाही मारायची मग काय…”, नितेश राणे उद्धव ठाकरेंवर संतापले
- OnePlus New Launch | OnePlus 10R 5G चे प्राइम ब्लू एडिशन होणार आहे लॉन्च, जाणून घ्या फोनचे फीचर्स..
- Maharashtra Rain Update | राज्यात पुढील काही दिवस ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
- Eknath Shinde | “…आता बोलणारे तेव्हा काय करत होते?” शिंदेंचा विरोधकांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

