Share

Sandeep Deshpande| “…तेव्हा मित्रालाच काय, राज साहेबांनी भावालाही सोडलं नाही”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. यामुळे राज्यातील राजकीय नेते एकमेकांविरोधात आरोप करत आहेत. अशातच शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामधूनही सत्ताधारी नेत्यांवर हल्ला करण्यात आला आहे. इतकंच नाही तर सामनामधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे ?

जेव्हा महाराष्ट्राच्या भल्याचा विषय येतो तेव्हा राज साहेबांनी मित्रांनाच काय पण भावाला पण सोडलं नाही त्यामुळे त्याची चिंता सामनाने करू नये, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी हे लिहिलं असल्याचं पाहायला मिळतं आहे.

तसेच, शिवसेनेचा आजचा आंदोलन हे नाटक आहे. ज्या वेळेला मराठी मुलांच्या नोकऱ्या परप्रांतीय हिसकावत होते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रभर आंदोलन करत होती, त्यादरम्यान राज साहेबांना अटक झाली होती. त्यावेळेला शिवसेना मात्र मुग गिळून गप्प होती, हेही देशपांडे यांनी सांगितलं आहे.

 सामनामधील राज ठाकरेंवरील टीका –

दरम्यान, राज ठाकरे यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली हे बरेच झाले. पण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे व येथील लाखभर तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे दुसरे-तिसरे कोणी नसून त्यांचे मित्र भाजपवालेच आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते गुजरातला वळवतील. हा धोका आताच लक्षात घेतला पाहिजे, अशी टीका सामनामधून राज ठाकरे यांच्यावर केली होती.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!