Share

BREAKING NEWS : औरंगाबादमध्ये ९ मे पर्यंत जमावबंदी लागू, राज ठाकरेंची सभा होणार रद्द?

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या सभेची जोरदार तयारी सुरु केली असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असतांनाच आता या सभेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली असून २६ एप्रिल ते ९ मे या काळात औरंगाबादमध्ये पोलिसांनी जमावबंदी चा आदेश काढला आहे. त्यामुळे राज ठाकरेंची सभा रद्द होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच पोलिसांच्या या निर्णयामुळे आता नवीन वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात बोलत असतांना शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे.

दरम्यान, मनसेनं या सभेचा एक टीझरही प्रकाशित केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरला हा टीझर शेअर केला असून टीझरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. तसेच चलो संभाजीनगर अशी घोषणाही त्यांनी दिली आहे. या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील काही वक्तव्यांचा वापर करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!