Share

“पुढची २५ वर्ष फडणवीस…” ; संजय राऊतांची मोठी भविष्यवाणी

Published On: 

मुंबई : काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी पक्षांवर चांगलीच टीका केली होती. त्याच दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख हिटलर प्रवृत्तीच सरकार, असा केला होता. त्यालाच आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिल आहे.

देवेंद्र फडणवीस पुढची २५ वर्ष सत्तेत येण्याची शक्यता नाही, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. तसेच फडणवीस यांनी घरात हनुमान चालिसा वाचून मन शांत करावं, असा खोचक सल्ला देखील राऊतांनी फडणवीसांना दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाकरे सरकारला हनुमान चालिसा म्हणत कारवाईच आव्हान दिलं होत. हनुमान चालिसा म्हणणं महाराष्ट्रात राजद्रोह होत असेल, तर मी मुख्यमंत्र्यांना सांगतो आम्ही राजद्रोह रोज करु, आमच्यावर राजद्रोह लावा, असे आव्हान फडणवीसांनी केले होते.

यावर संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत की ते परत सत्तेत येऊ शकले नाहीत. तसेच पुढचे २५ वर्ष सत्ते येण्याची सुतराम शक्यता नाही. त्यातुन फडणवीस यांनी अस्वस्थता निर्माण झाली आहे, त्यांच्या मनामध्ये अशांतता आहे. यावर एकच उपाय आहे. त्यांनी आपल्या घरामध्ये हनुमान चालिसा वाचावी आणि मन शांत कराव.”

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!