🕒 1 min read
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेण्याची घोषणा केली होती. परंतु, आता या सभेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली असून २६ एप्रिल ते ९ मे या काळात औरंगाबादमध्ये पोलिसांनी जमावबंदी चा आदेश काढला आहे. त्यामुळे राज ठाकरेंची सभा रद्द होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच पोलिसांच्या या निर्णयामुळे आता नवीन वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता या मुद्द्यावर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी यासंदर्भात ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘राजसाहेबांची संभाजीनगरची सभा होवू नये म्हणून नादान सरकारचे किती प्रयत्न? परवानगीसाठी आडकाठी, आता जमावबंदी. इतकी का भीती? तुम्ही कितीही थांबण्याचा प्रयत्न केला तरी ही हिंदुत्वाची पर्वणी सुरुच राहणार’, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, मनसेनं या सभेचा एक टीझरही प्रकाशित केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरला हा टीझर शेअर केला असून टीझरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. तसेच चलो संभाजीनगर अशी घोषणाही त्यांनी दिली आहे. या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील काही वक्तव्यांचा वापर करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाचा ; सदाभाऊ खोतांची जहरी टीका
- “राम मंदिर बांधण्याचा आदेश कोर्टाने दिला, यांनी तर फक्त…”, मुख्यमंत्र्यांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला
- कोरोनाचा हाहाकार! वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर PM मोदी घेणार बैठक
- BREAKING NEWS : औरंगाबादमध्ये ९ मे पर्यंत जमावबंदी लागू, राज ठाकरेंची सभा होणार रद्द?
- “…हे भान नसलेला महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री मिळाला”, निलेश राणेंचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
