🕒 1 min read
मुंबई : काल (२५ एप्रिल) मुंबईमध्ये ‘बेस्ट’ बसच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान, या मुद्यावरून आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘काल मुख्यमंत्री BEST आयोजित नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड कार्यक्रमाला गेले आणि राजकीय बोलून निघाले. कार्यक्रम काय आहे? आपण काय बोलतोय? कसं बोलतोय? हे भान नसलेला महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री मिळाला’, असा घणाघात राणेंनी केला. तसेच विरोधकांवर टीका करण्यासाठी व्यासपीठ राजकीय असावं हे सुद्धा मुख्यमंत्र्याला कळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
काल मुख्यमंत्री BEST आयोजित नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड कार्यक्रमाला गेले आणि राजकीय बोलून निघाले. कार्यक्रम काय आहे आपण काय बोलतोय कसं बोलतोय हे भान नसलेला महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री मिळाला. विरोधकांवर टीका करण्यासाठी व्यासपीठ राजकीय असावं हे सुद्धा मुख्यमंत्र्याला कळत नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 26, 2022
दरम्यान, काल हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,‘ताळतंत्र थोडसं सोडायला काय हरकत आहे. म्हणे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे. हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का?बाबरी पडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात. आम्हाला हिंदुत्व शिकवत आहात तर तुमचे हिंदुत्व आहे कुठे?.’ तसेच घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी गदाधारी हिंदुत्ववाल्यांना शिकवू नये,आमचे हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का?”, विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल
- “राम मंदिर बांधण्याचा आदेश कोर्टाने दिला, यांनी तर फक्त…”, मुख्यमंत्र्यांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला
- कोरोनाचा हाहाकार! वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर PM मोदी घेणार बैठक
- BREAKING NEWS : औरंगाबादमध्ये ९ मे पर्यंत जमावबंदी लागू, राज ठाकरेंची सभा होणार रद्द?
- IPL 2022 PBKS vs CSK : ६ वर्षानंतर आयपीएल खेळणाऱ्या ऋषी धवननं का लावली होती face shield? वाचा कारण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
