मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती मिळत आहे. त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या आवश्यक त्या तपासण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.
सध्या धनंजय मुंडे यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली आहे. “राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. कामाचा ताण व प्रवास इ. मुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. काल रात्री उशिरा मी त्यांची भेट घेऊन डॉक्टरांशी देखील सविस्तर चर्चा केली आहे. काही काळ आराम करून ते पुन्हा एकदा आधीच्याच उत्साहाने जनतेच्या सेवेत रूजू होतील.”, अशी माहिती राजेश टोपे यांनी ट्वीट करत दिली आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच धनंजय मुंडे यांना पाहण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात नेतेमंडळींनी त्वरित धाव घेतल्याचे दिसून आले. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे असलेले धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपची युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चामध्ये प्रवेश करून केली. 2012 मध्ये त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. आज ते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
“अशा लोकांना आमचे आजोबा लवंडे म्हणायचे”; राज ठाकरेंचा संजय राऊतांवर घणाघात
शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत – राज ठाकरे
“शरद पवार हे नास्तिक, त्यांना धर्माशी देणंघेणं नाही”; राज ठाकरेंचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

