औरंगाबाद : शहरात दोन वर्षांपासून धुमाकूळ घालणारी चंदनचोर टोळीला गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. त्यांच्या कडून तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गौसखान महेमूद खान पठाण वय ६०, अनिस खान अय्युब खान वय २१, नयुम अय्युब पठाण वय २६, नसीब अली खान वय २४, सलीम मोहम्मद खान वय २६ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शहरात दोन वर्षांपासून चंदनचोर चंदनाची झाडे तोडून नेण्यात यशस्वी होत होते. त्यांना पकडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला आदेश देत, चंदन चोरीवर आळा घालण्यासाठी पथकाला सुचांना केल्या. पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख पथकासह गस्त घालत असतना. त्यांना खबऱ्याने माहिती दिली की, कॅम्ब्रीज ते सावंगी रोडवर काही लोक चंदनाची खरेदी विक्री करण्यासाठी येणार आहे. त्याआधारे अमोल देशमुख यांनी सापळा लावला.
काही वेळानंतर तिथे दोन दुचाकीवर पाच जन आले. माहितीतील वर्णानुसार ते असल्याची खात्री करत त्यांना अडवून त्यांची झडती पोलिसांनी घेतली. त्यांच्या जवळ असलेल्या गोणपाटात चंदनाचे खोड मिळाले. त्यांना तत्काळ याब्यात घेत त्यांची चौकशी करण्यात आली. त्यात त्यांनी शहरातील १५ गुन्हांची कबुली दिली तर जालना जिल्ह्यात एक चोरी केल्याचे सांगितले.
त्यांनी जिल्हाधिकारी निवासस्थान, वाळूज येथे कंपनीतून, छावणी पोस्ट ऑफिस जवळ, चिकलठाणा येथील एसटी वर्क शॉपमधील, क्राईसचर्च छावणी, श्रेयनगर, कडा ऑफिस, समर्थनगर, एन-३ सिडको, एन-११, मुकुंदवाडी गावात, विद्युत कॉलनीत, नाथ व्हाली शाळेमागे, आयडिया कॉलसेंटर जवळ, पु. ना. गाडगीळ दुकानासमोर, बाबा पेट्रोलपंप, पुष्पनगरी, फुलंब्री येथे कधी अंधाराचा फायदा घेऊन तर कधी वॉचमनला धाक दाखून चंदनाचे झाड चोरून नेले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मिल्खा सिंग यांची तब्येत पुन्हा खालावली ; ICU मध्ये दाखल
- ‘गोपीचंद पडळकर भाजपचे बुजगावणं, त्यांच्याकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये’
- २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल असं काम करा; पटोलेंनी पुन्हा ठोकला ‘स्वबळाचा’ शड्डू
- शतक कॉनवेचे; चर्चा मात्र दादाची! जाणून घ्या काय आहे कारण..
- ‘मला घाई होती, त्यामुळे पत्रकार परिषदेत ‘तत्वतः’ मान्यता हा शब्द राहिला’; वडेट्टीवारांच अजब स्पष्टीकरण


