Share

गेवराईत वाळूमाफियांचा धुडगूस! मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर घातला टिप्पर

Published On: 

🕒 1 min read

बीड : गेवराई तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सर्रास सुरू आहे. याबाबत अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पाडळसिंगी टोलनाका परिसरात प्रशासनाने पकडला. यावेळी टिप्पर चालकाने मंडळ अधिकाऱ्याच्या गाडीला धडक देत टिप्पर पळून नेल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या प्रकरणामुळे अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे आणि कर्मचारी राष्ट्रीय महार्गावरील पाडळसिंगी टोलनाका येथे वाळू वाहतुकीचा परवाना चेक करत होते. ते गेल्यानंतर मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी वाळू वाहतुकीची तपासणी सुरू ठेवली. यावेळी वाळूने भरलेला (एमएच २३ डब्लू -४२९९) टिप्पर आला. चालकाकडे मुदत संपलेली पावती आढळून आली. त्यामुळे तो टिप्पर कारवाईसाठी नेण्यात येणार होता.

यावेळी तिथे एका काळ्या स्कार्पिओ (एमएच २३ एडी-५९९०) मधून वाळूमाफिया आले आणि टिप्पर पळवून नेला. अधिकाऱ्यांनी टिप्परचा पाठलाग केला असता शेख जुनैद चाँद आणि चालकाने जीवे मारण्याच्या उद्देशाने गाडीला धडक दिली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात मंडळअधिकारी अमोल कुरुलकर यांनी दिलेल्या फिर्यादीत वरून कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपी फरार झालेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!