🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री सना खान सध्या तिच्या वैवाहिक आणि अध्यात्मिक जीवनात सुखी आहे. तिने सिनेसृष्टीला कायमचा राम राम ठोकला आहे. आता ती हिजाब आणि बुरखा परिधान करते. सनाने नुकताच तिचा नवा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावर अनेकांनी तिला चांगल्या कमेंट्स दिल्या पण एका युझरने तिची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. यावर तिने एका युजरला सडेतोड उत्तर दिले आहे.
https://www.instagram.com/p/CPnQ4Ecj670/?utm_source=ig_embed&ig_rid=c5e2f2af-4796-4be5-979f-c0aee9b1bd80
तो युझर म्हणाला, ‘इतकं शिकून काय फायदा, सगळ्यांसारखं पडद्यातचं राहायचं होतं तर.’ यावर सनाने त्याला जोरदार उत्तर दिलं, ती म्हणाली, ‘माझ्या भावा पडद्यात राहून मी माझा व्यवसाय करू शकते, मला चांगलं सासर मिळालं आहे. चांगला पती आहे. यापेक्षा आणखी काय हवं. सर्वांत महत्त्वाचं अल्लाह माझं संरक्षण करतो आहे. अल्हामदुलिल्हा.’ सना नेहमी कुराणातले दाखले देऊन पोस्ट करत असते. या ग्रंथातील संदर्भ असलेले संदेश सोशल मीडियावर पोस्ट करत अनेकांना ती मार्गदर्शनही करते.
सना खानने मागील वर्षी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसं तिने सोशल मीडियावरून जाहीरही केलं. धर्मासाठी आपला हा निर्णय घेतला, असं तिचं म्हणणं आहे. त्यानंतर तिने एका मौलवी व्यक्तीशी विवाह केला आणि ती आता संपूर्ण वेगळंच जीवन जगत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मिल्खा सिंग यांची तब्येत पुन्हा खालावली ; ICU मध्ये दाखल
- ‘गोपीचंद पडळकर भाजपचे बुजगावणं, त्यांच्याकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये’
- २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल असं काम करा; पटोलेंनी पुन्हा ठोकला ‘स्वबळाचा’ शड्डू
- शतक कॉनवेचे; चर्चा मात्र दादाची! जाणून घ्या काय आहे कारण..
- ‘मला घाई होती, त्यामुळे पत्रकार परिषदेत ‘तत्वतः’ मान्यता हा शब्द राहिला’; वडेट्टीवारांच अजब स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
