Share

समीर वानखेडेंच्या अडचणींमध्ये होणार वाढ?; धनंजय मुंडेंचे महत्वाचे वक्तव्य, म्हणाले…

Published On: 

पुणे : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरून याप्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान आता समीर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्हं दिसत आहेत. शनिवारी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी वानखेडेंसंदर्भात एक महत्वाचे वक्तव्य केले आहे.

यावेळी बोलत असतांना ते म्हणाले की,’समीर वानखेडे यांच्या जातप्रमाण पत्राच्या वैधतेबद्दल कोणी आक्षेप घेतला, त्यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार केली तर आम्ही या प्रकरणी चौकशी करु,’असे मुंडे म्हणाले आहेत.

दरम्यान, याच मुद्द्यावरुन भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीला केवळ समीर वानखेडेंवर हल्लाबोल करायचा आहे अशी टीका केली. ते म्हणाले की,’राज्याच्या सामाजिक न्याय विभागाला तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर तपास करण्याचे हक्क आहेत. सध्या समीर वानखेडे हेच या सरकारच्या एकमेव अजेंड्यापैकी एक आहेत. वानखेडे हे काही आमच्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा भाजपा नेत्याचे नातेवाईक नाहीत. ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला लक्ष्य करणं हे योग्य नाही.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!