Share

समीर वानखेडेंच्या अडचणीत भर; शाहरुख खानकडे खंडणी मागितल्याचा आरोप

Published On: 

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एक पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने प्रतिज्ञापत्रावर केलेल्या आरोपांमुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे म्हणजेच एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे हे अडचणीत सापडले असताना त्यांच्यांविरुद्ध अ‍ॅड. सुधा द्विवेदी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. अभिनेता शाहरुख खान याच्याकडे खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली वानखेडे आणि अन्य व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या तक्रार अर्जामधून करण्यात आली आहे.

अ‌ॅड. सुधा द्विवेदी यांनी मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस स्टेशन तसेच मुंबईचे सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली आहे. आर्यन खान याला सोडण्यासाठी अभिनेता शाहरुख खान याच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी समीर वानखेडे आणि अन्य 5 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी द्विवेदी यांनी तक्रारीत केली आहे.

तक्रारीत किरण गोसावी, सॅम डिसुझा आणि प्रभाकर साईल यांची नावे असून या सर्वांवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, असे सुधा द्विवेदी यांनी नमूद केले आहे. सुधा द्विवेदी यांची तक्रार प्राप्त झाली असल्याचा दुजोरा एका अधिकाऱ्याने दिला. तक्रार प्राप्त झाली असली तरी याबाबत अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेले नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!