Share

समीर वानखेडे 70 हजारचे शर्ट वापरतो, रोज दोन लाखांचे बूट घालतो-नवाब मलिक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पत्रकार परिषद घेत आहेत. आता त्यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवे आरोप केले आहेत.

नवाब मलिकांनी आता समीर वानखेडेंच्या पेहरावावर देखील आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलंय की, समीर वानखेडे यांनी आजवर हजारो कोटी रुपये उकळले आहेत. समीर वानखेडे 70 हजारचे शर्ट वापरतो. रोज दोन लाखांचे बूट घालतो. याचं कारण स्पष्ट आहे की, समीर वानखडे यांनी आजवर हजारो कोटी उकळले आहेत.असे त्यांनी म्हटले आहे. समीर वानखेडे हा मोदींपेक्षाही पुढचा निघाला. वानखेडे मोदींपेक्षा महाग कपडे वापरतात. तुम्ही त्यांचे सगळे कपडे, बुट पहा, टी शर्टची किंमत तीस हजारापासून सुरु होते. घड्याळ रोज बदलते. वीस लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतची घड्याळे त्यांच्याकडे असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान नवाब मलिक यांनी एक दावा केला आहे की, आर्यन खान केसमध्ये 18 करोडचा सौदा झाला होता. सॅम डिसोझा आता समोर आला आहे, त्याने काल तसे कबूल केले आहे की असा सौदा झाला आहे. हा सर्व फर्जीवाडा समीर वानखेडे करत होता. चित्रपटातील काही कलाकारांना गेल्यावेळी असेच चौकशीसाठी बोलावले होते. यामध्ये सारा अली खान, दीपिका यांची नावे असल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!