Share

समीर वानखेडे अल्पवयीन असतानाच त्यांच्याकडे….. ;नवाब मलिकांचा आणखी एक गोप्यस्फोट

Published On: 

मुंबई: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यात चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर आरोप केला आहे. शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यात त्यांनी आणखी एक मोठा गोप्यस्फोट समीर वानखेडे यांच्यावर केला आहे.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणातून एका वेगळ्या वळणावर हे प्रकरण जात असल्याचे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून दिसत आहे. मध्यंतरी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे हिंदू नसून मुस्लिम असल्याचा दावा देखील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्याच सोबत समीर वानखेडे यांचे संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्स डिलर सोबत असल्याचा देखील त्यांनी आरोप केला होता. आता नवाब मलिक यांनी आणखी एक गंभीर आरोप समीर वानखेडे यांच्यावर लावला आहे.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे अल्पवयीन असताना त्यांच्याकडे दारू विक्रीचा परवाना असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे आणि तो परवाना आजतागायत कायम असल्याचे देखील मलिक म्हणाले आहेत. समीर वानखेडे १७ वर्षे, १० महीने, १९ दिवसांचे असताना त्यांना उत्पादन शुल्क खात्यातून दारू विक्रीचा परवाना मिळाला. समीर वानखेडे यांचे वडील दाऊद वानखेडे हे उत्पादन शुल्क विभागात नोकरीला होते. पदाचा गैरवापर करून त्यांनी १९९७ साली अल्पवयीन मुलाच्या म्हणजेच समीर वानखेडे यांच्या नावाने दारू विक्रीचा परवाना मिळवून घेतला होता, असा खळबळजनक आरोप अल्पसंख्यान मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!