मुंबई : क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी चर्चेत आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतलं होतं. समीर वानखेडे यांनी आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर राज्यात या प्रकरणावरुन अनेक उलाढाली झाल्या. हे प्रकरण वानखेडे यांच्या अगदी वैयक्तीक आयुष्यापर्यंत गेलं. आता मात्र आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडून काढण्यात आला आहे. विविध आरोपांनंतर वानखेडेंकडून हा तपास काढण्यात आला आहे.
आर्यन खानसह सहा प्रकरणांचा तपास आता दिल्ली एनसीबी करणार आहे. यामध्ये नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. अरमान कोहली, इक्बाल कासकर, काश्मीर ड्रग्ज प्रकरणाचा तपासही वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. दरम्यान मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडे कायम राहणार आहे. मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
दरम्यान, अल्प संख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जातीच्या प्रमाणपत्रावर संशय व्यक्त केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी वानखेडे दिल्लीत गेले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षांची भेट घेतली होती. आयोगाच्या अध्यक्षांना सर्व कागदपत्रे सादरही केली होती. आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कागदपत्रांची चौकशी सुरू केली. मात्र, त्यापूर्वीच वानखेडेंवर आरोपांमागून आरोप होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- हा तर फक्त लॉलिपॉप; पेट्रोल-डिझेल दरकपातीवर काँग्रेसचं टीकास्त्र
- ‘मुख्यमंत्री माझ्या कानात एक वाक्य बोलले तेव्हाच ठरवलं आता भांडाफोड करायचाच’
- अनिल देशमुखांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज करणार; वकिलांनी दिली माहिती
- कृषी कायद्यांना विरोध करणारे गावातील बेरोजगार दारुडे; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
- किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत ‘या’ तारखेपर्यंत वाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

